नांदेड-पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान निवासी शिबिर 2026
नांदेड, 19 मे (हिं.स.)पंडित दीनदयाळ उपाध्याय जिल्हा प्रशिक्षण अभियान नांदेड महानगरच्या वतीने आयोजित शिबिर प्रसंगी सोशल मीडिया बाबत श्री निखिल भामरे यांनी मार्गदर्शन केले. या सत्रासाठी अध्यक्ष ज्येष्ठ नेते जनार्दन ठाकूर हे होते. दुसऱ्या सत्रात हमा
Q


नांदेड, 19 मे (हिं.स.)पंडित दीनदयाळ उपाध्याय जिल्हा प्रशिक्षण अभियान नांदेड महानगरच्या वतीने आयोजित शिबिर प्रसंगी सोशल मीडिया बाबत श्री निखिल भामरे यांनी मार्गदर्शन केले. या सत्रासाठी अध्यक्ष ज्येष्ठ नेते जनार्दन ठाकूर हे होते. दुसऱ्या सत्रात हमारा सैद्धांतिक अधिष्ठान विषयावर मा.डॉ.राजेंद्रजी फडके यांनी विचार मांडले या सत्राला नांदेडच्या महापौर कविताताई मुळे अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. तसेच समारोपीय सत्रात हमारा इतिहास और विकास या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून मा.खासदार श्री अजित गोपछडे तर सत्र अध्यक्ष म्हणून आमदार श्री राम पाटील रातोळीकर हे उपस्थित होते. त्याचबरोबर सर्वप्रथम सकाळी सर्वांनी योगशिक्षक सुरेश लंगडापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली योगा केला. या दोन दिवशी पंडित दीनदयाल उपाध्याय निवासी प्रशिक्षण महाअभियानात कार्यकर्त्यांची उपस्थिती ही पूर्ण वेळ होती. प्रशिक्षण शिबिरासाठी आलेल्या प्रमुख वक्त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा नक्कीच सर्वांना लाभ मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande