भाजप युवा मोर्चा महानगर नांदेडची नवीन कार्यकारिणी जाहीर
नांदेड, 19 मे, (हिं.स.) - भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महानगर नांदेडची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2047 पर्यंत विकसित भारत'' बनवण्याच्या ऐतिहासिक संकल्पाला गती देण्यासाठी आणि हा विचार तळागाळातील युवकांपर्य
अ


नांदेड, 19 मे, (हिं.स.) - भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महानगर नांदेडची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2047 पर्यंत विकसित भारत' बनवण्याच्या ऐतिहासिक संकल्पाला गती देण्यासाठी आणि हा विचार तळागाळातील युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही नवी टीम सज्ज झाली आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनजी यांच्या देशव्यापी संघटन कौशल्याच्या प्रेरणेने, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतीमान व कणखर नेतृत्वात, तसेच भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली नांदेड महानगर युवा मोर्चाला एक नवी आणि ऊर्जावान दिशा मिळाली आहे.

भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाचे धडाडीचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली ही तरुण, तडफदार आणि गतिमान टीम नांदेड शहरात पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्यासाठी कटिबद्ध असेल.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande