
आगामी 18 जून रोजी मतदान; 22 जूनला मतमोजणी
छत्रपती संभाजीनगर, 19 मे (हिं.स.) : भारत निवडणूक आयोग अंतर्गत औरंगाबाद–जालना स्थानिक प्राधिकारी विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून मतदान गुरुवार, 18 जून 2026 रोजी होणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सविता चौधर यांनी दिली.
निवडणूक कार्यक्रमानुसार अधिसूचना सोमवार, 25 मे 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अंतिम तारीख सोमवार, 1 जून 2026 आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी मंगळवार, 2 जून 2026 रोजी होणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख गुरुवार, 4 जून 2026 निश्चित करण्यात आली आहे. मतदान 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत होणार आहे. मतमोजणी सोमवार, 22 जून 2026 रोजी होईल, तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 25 जून 2026 पर्यंत पूर्ण केली जाणार आहे.
या निवडणूक कार्यक्रमाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis