रायगडावर 6 जून व 26 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा; नियोजनाला वेग
रायगड, 19 मे (हिं.स.)। दुर्गराज रायगड येथे होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, कार्यक्रमाचे काटेकोर व सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्व संबंधित विभागांना दिल्या आहेत.
Shivarajyabhishek-ceremony-to-

## शिवराज्याभिषेक सोहळ्याचे काटेकोर नियोजन करा – जिल्हाधिकारी किशन जावळे  दुर्गराज रायगड येथे होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, कार्यक्रमाचे काटेकोर व सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्व संबंधित विभागांना दिल्या आहेत. तारखेनुसार 6 जून आणि तिथीनुसार 26 जून 2026 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृश्यप्रणालीद्वारे आढावा बैठक पार पडली.  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ. रविंद्र शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष आणि ऑनलाइन उपस्थित होते.  यावेळी बोलताना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले की, शिवराज्याभिषेक सोहळा हा लाखो शिवभक्तांच्या श्रद्धेचा विषय असून कार्यक्रम सुव्यवस्थित आणि सुरक्षित वातावरणात पार पडणे ही प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे. गडावर येणाऱ्या शिवभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आरोग्य, पाणीपुरवठा, मंडप, खानपान, परिवहन, राजशिष्टाचार, विद्युत, स्वच्छता आणि शौचालय अशा विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक समितीने आपापल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडून कार्यक्रम यशस्वी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.  आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन गडावर वैद्यकीय पथके, स्ट्रेचर, आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. विशेषतः सर्पदंशाच्या घटना लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक औषधांची उपलब्धता ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मंडप, भोजन, विद्युत आणि आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यावर भर देण्यात आला.  यावर्षी कोणतीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी पार्किंग व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि गडाकडे जाणाऱ्या मार्गांचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच वाहनतळ आणि मार्गदर्शनासाठी आवश्यक माहिती फलक उभारण्याचे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले.  शिवभक्तांशी सलोख्याने वागून काटकसरीच्या धोरणानुसार खर्च करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यावेळी केले.

रायगड, 19 मे (हिं.स.)। दुर्गराज रायगड येथे होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, कार्यक्रमाचे काटेकोर व सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्व संबंधित विभागांना दिल्या आहेत. तारखेनुसार 6 जून आणि तिथीनुसार 26 जून 2026 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृश्यप्रणालीद्वारे आढावा बैठक पार पडली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ. रविंद्र शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष आणि ऑनलाइन उपस्थित होते.यावेळी बोलताना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले की, शिवराज्याभिषेक सोहळा हा लाखो शिवभक्तांच्या श्रद्धेचा विषय असून कार्यक्रम सुव्यवस्थित आणि सुरक्षित वातावरणात पार पडणे ही प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे. गडावर येणाऱ्या शिवभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आरोग्य, पाणीपुरवठा, मंडप, खानपान, परिवहन, राजशिष्टाचार, विद्युत, स्वच्छता आणि शौचालय अशा विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक समितीने आपापल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडून कार्यक्रम यशस्वी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन गडावर वैद्यकीय पथके, स्ट्रेचर, आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. विशेषतः सर्पदंशाच्या घटना लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक औषधांची उपलब्धता ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मंडप, भोजन, विद्युत आणि आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यावर भर देण्यात आला.यावर्षी कोणतीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी पार्किंग व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि गडाकडे जाणाऱ्या मार्गांचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच वाहनतळ आणि मार्गदर्शनासाठी आवश्यक माहिती फलक उभारण्याचे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले.शिवभक्तांशी सलोख्याने वागून काटकसरीच्या धोरणानुसार खर्च करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यावेळी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

 rajesh pande