पुणे परिमंडलातील ग्राहकांसाठी मोठी संधी; अडीच हजारांत सौर प्रकल्प, २५ वर्षे मोफत वीज
पुणे, 19 मे (हिं.स.)महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अर्थात महावितरणकडून ‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज’ आणि ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट)’ योजनेंतर्गत पुणे परिमंडलातील ३७ हजार ७७२ ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या यो
Solor


पुणे, 19 मे (हिं.स.)महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अर्थात महावितरणकडून ‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज’ आणि ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट)’ योजनेंतर्गत पुणे परिमंडलातील ३७ हजार ७७२ ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेंतर्गत पात्र ग्राहकांना केवळ अडीच हजार ते दहा हजार रुपयांत एक किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प बसविता येणार असून, पुढील २५ वर्षे मोफत वीज मिळण्याचा लाभ मिळणार आहे.

मे महिना ‘सोलार महिना’ म्हणून साजरा केला जात असून, त्यानिमित्त महावितरणने ही विशेष संधी उपलब्ध करून दिली आहे. दरमहा १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणारे ग्राहक, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या योजनेसाठी पात्र असणार आहेत.

या योजनेअंतर्गत एक किलोवॉट सौर प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून ३० हजार रुपये तर राज्य सरकारकडून १७ हजार ५०० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना फक्त अडीच हजार रुपये, अनुसूचित जाती-जमातीतील ग्राहकांना पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण आर्थिक दुर्बल घटकांना दहा हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत.‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर योजना राबविण्यात येत असून, इच्छुक ग्राहकांनी ‘पीएम सूर्यघर’ ॲप किंवा महावितरणच्या iSMART पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande