जागतिक मधमाशी दिनानिमित्त राज्यस्तरीय मधुमित्र, मधुसखी पुरस्कार प्रदान सोहळा
छत्रपती संभाजीनगर, 19 मे (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई, मध संचालनालय, महाबळेश्वर यांच्यावतीने जागतिक मधमाशी दिनानिमित्त राज्यस्तरीय मधुमित्र व मधुसखी पुरस्कार प्रदान कार्यक्रम बुधवार दि.२० रोजी सकाळी ११ वा. संत एकनाथ रंग
जागतिक मधमाशी दिनानिमित्त राज्यस्तरीय मधुमित्र, मधुसखी पुरस्कार प्रदान सोहळा


छत्रपती संभाजीनगर, 19 मे (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई, मध संचालनालय, महाबळेश्वर यांच्यावतीने जागतिक मधमाशी दिनानिमित्त राज्यस्तरीय मधुमित्र व मधुसखी पुरस्कार प्रदान कार्यक्रम बुधवार दि.२० रोजी सकाळी ११ वा. संत एकनाथ रंगमंदिर येथे आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. तर मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत, सह मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार डांगर, नित्यानंद पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. उपस्थितीचे आवाहन संचालक रघुनाथ नारायणकर, विशेष कार्य अधिकारी दिग्विजय पाटील, सहा. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रुपेश आचारी, कार्यासन अधिकारी अनंत कदम, योगेश पवार यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande