
मुंबई, 19 मे, (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या ‘इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धन’ या आवाहनाला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी आपल्या दैनंदिन वापरासाठी इलेक्ट्रिक कारचा स्वीकार करत हरित ऊर्जा आणि स्वच्छ पर्यावरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
इलेक्ट्रिक कारच्या वापरासोबतच त्यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या देखील कमी केली आहे. “जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासह इंधन बचत ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. छोट्या-छोट्या कृतींमधूनही मोठा बदल घडवून आणता येतो” असा संदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर