
रत्नागिरी, 19 मे (हिं.स.) । जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत बुधवार, २० मे, २०२६ रोजी आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा विधानपरिषद निवडणूक आचारसंहितेमुळे पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आला आहे.
सर्व उमेदवार, प्रशिक्षण संस्था, महाविद्यालये व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त मोरेश्वर दुधाळ यांनी कळविले आहे. रोजगार मेळाव्याच्या नियोजनाबाबत नवीन तारीख, ठिकाण आणि वेळ यांची माहिती लवकरच कळविण्यात येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी