विधान परिषद निवडणूक : अमरावतीत आचारसंहिता लागू
अमरावती, 19 मे (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांतील द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात अमरावतीचा समावेश असल्याने मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तातडीने लागू करण्यात आली
विधान परिषद निवडणूक, जिल्ह्यात आचारसंहिता लागू


अमरावती, 19 मे (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांतील द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात अमरावतीचा समावेश असल्याने मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तातडीने लागू करण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यामध्ये स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार, २५ मे २०२६ रोजी अधिसूचना जारी

करणे, १ जूनरोजीनामांकने (उमेदवारी अर्ज) दाखल करण्याची अंतिम तारीख, २ जून रोजी नामांकनांची छाननी, ४ जूनरोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख, १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदान, २२ जून रोजी मतमोजणी, २५ जून रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande