नाशिकच्या विकासासाठी जे जे हवं ते देणार; शिंदे सरकार कटिबद्ध – खा. श्रीकांत शिंदे
उपमहापौर विलास शिंदे यांच्या प्रयत्नातून प्रभाग ८ मध्ये विविध विकास कामांचे लोकार्पण नाशिक, 19 मे (हिं.स.)। फडणवीस-शिंदे सरकारच्या कार्यकाळात ज्या वेगाने विकासकामे होत आहेत, तशी कामे यापूर्वी कधीच झाली नव्हती. राज्याला १८-१८ तास काम करणारा नेता मि
We will provide whatever


उपमहापौर विलास शिंदे यांच्या प्रयत्नातून प्रभाग ८ मध्ये विविध विकास कामांचे लोकार्पण

नाशिक, 19 मे (हिं.स.)। फडणवीस-शिंदे सरकारच्या कार्यकाळात ज्या वेगाने विकासकामे होत आहेत, तशी कामे यापूर्वी कधीच झाली नव्हती. राज्याला १८-१८ तास काम करणारा नेता मिळाला असून नाशिकच्या विकासासाठी जे काही आवश्यक असेल ते देण्यासाठी शिंदे सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन खा श्रीकांत शिंदे यांनी केले.

प्रभाग क्रमांक ८ मधील गंगापूर गाव परिसरात उपमहापौर विलास शिंदे यांच्या पुढाकारातून विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा मंत्री आ. गुलाबराव पाटील, आ. सुहास कांदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, मनपा आयुक्त मनीषा खत्री, माजी महापौर दशरथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी गंगापूर गाव भाजी मार्केट व सभागृह, राजवाडा परिसरातील सभागृह व उद्यान, गोदावरी परिचय उद्यान तसेच वैकुंठ रथ आदी विविध विकासकामांचे लोकार्पण खा. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपमहापौर विलास शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले. महिला सक्षमीकरणाचे खऱ्या अर्थाने काम विलास शिंदे करत आहेत. माणसापेक्षा माणुसकी मोठी असते, याची प्रचिती आजच्या प्रचंड उपस्थितीतून दिसून येते असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात उपमहापौर विलास शिंदे यांनी सांगितले की, शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर उपमहापौर पदाची जबाबदारी सोपवून आज शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. त्या निमित्ताने प्रभागातील विकासकामांचे लोकार्पण आयोजित करण्यात आले आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकसाठी ३५ हजार कोटी रुपयांचा निधी देऊन एकनाथ शिंदे यांनी शहरावरील प्रेम व्यक्त केले आहे. पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, एक काम कमी करू, पण चुकीचे काम करणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमास नगरसेविका इंदुबाई नागरे, नगरसेवक निवृत्ती इंगोले, शिव कर्मचारी सेना प्रदेश चिटणीस विक्रम नागरे, माजी नगरसेवक संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके, स्वप्नील पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मी बाळासाहेबांचा पाईक; उद्धव सेनेतच राहणार – राजाभाऊ वाजेकार्यक्रमादरम्यान खासदार राजाभाऊ वाजे यांनी सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देताना, “मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पाईक असून उद्धव सेनेतच राहणार आहे, असे स्पष्ट केले.त्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपण सर्वजण बाळासाहेबांच्या विचारांचेच पाईक आहोत, असे सांगत अप्रत्यक्षपणे शिंदे सेनेत येण्याचे निमंत्रण दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande