गंगाखेडकरांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार - आ. डॉ. राहुल पाटील
परभणी, 19 मे (हिं.स.)। गंगाखेड तालुका व मतदारसंघ हा बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या विचारांवर प्रेम करणारा असल्याचे सांगत, पक्षाने संपूर्ण परभणी जिल्ह्याची संघटनात्मक जबाबदारी दिल्याने आता गंगाखेडकरांच्या सुख-दुःखात, विकासात्मक कार्यात आणि जि
गंगाखेडकरांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार आ. डॉ. राहुल पाटील यांनी दिला गंगाखेडकरांना शब्द


परभणी, 19 मे (हिं.स.)। गंगाखेड तालुका व मतदारसंघ हा बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या विचारांवर प्रेम करणारा असल्याचे सांगत, पक्षाने संपूर्ण परभणी जिल्ह्याची संघटनात्मक जबाबदारी दिल्याने आता गंगाखेडकरांच्या सुख-दुःखात, विकासात्मक कार्यात आणि जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले.

शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन व्यापारी संघ, विविध सामाजिक संस्था आणि शिवसेनेच्या वतीने मोरया फंक्शन हॉल येथे करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, परभणी महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर, रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ भालेराव, विठ्ठलराव रबदडे, डॉ. सुभाष कदम, माजी जि.प. सभापती श्रीनिवास मुंडे, नगरसेवक धम्मानंद घोबाळे, पंडितराव मुंडे गुरुजी, मनोहर महाराज केंद्रे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडू सोमानी, सुभाष दादा नळदकर, उपजिल्हाप्रमुख महादेव शेंडगे, बालाजी लोखंडे, साहेबराव कल्याणकर, तालुकाप्रमुख जानकीराम पवार, बापूराव पोळ, छगनराव मोरे, तालुका संघटक धोंडीराम जाधव, शिक्षक सेनेचे बाळासाहेब राखे, सायस चिलगर, तालुका अधिकारी भागवत शिंदे, शहर संघटक अमोल खटिंग, प्रा. मुंजाजी चोरघडे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. राहुल पाटील पुढे म्हणाले की, परभणी जिल्हा हा कायम शिवसेनेचा बालेकिल्ला राहील. भविष्यात दोन्ही जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांच्या मदतीने चारही विधानसभा मतदारसंघांवर भगवा फडकविण्याचा निर्धार करण्यात येणार आहे.

यावेळी विष्णू मुरकुटे म्हणाले की, सामाजिक कार्य आणि पक्षभेद न करता सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी राहिल्यामुळे पक्षाने माझ्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत ही जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande