पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शनावरून गोंधळ
कार्यकर्त्यांची गर्दी; व्हीआयपी व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह सोलापूर, 19 मे (हिं.स.) : उन्हाळी सुट्ट्यांमुळे आणि देशभरातून येणाऱ्या हजारो भाविकांच्या गर्दीमुळे पंढरपुरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या असताना, व्हीआयपी दर्शन व्यवस्थेवरून
evm


कार्यकर्त्यांची गर्दी; व्हीआयपी व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

सोलापूर, 19 मे (हिं.स.) : उन्हाळी सुट्ट्यांमुळे आणि देशभरातून येणाऱ्या हजारो भाविकांच्या गर्दीमुळे पंढरपुरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या असताना, व्हीआयपी दर्शन व्यवस्थेवरून मंदिर परिसरात गोंधळ निर्माण झाल्याचे समोर आले आहे.

कृष्णराज महाडिक यांच्या पंढरपूर दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांनी व्हीआयपी गेटवर गर्दी करत धक्काबुक्की आणि ढकलाढकली केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

माहितीनुसार, कृष्णराज महाडिक हे शेकडो कार्यकर्त्यांसह पंढरपुरात आले होते. त्यांना आणि काही मोजक्या व्यक्तींना व्हीआयपी गेटवरून मंदिरात प्रवेश देण्यात आला. मात्र, त्यांच्यासोबत आलेल्या मोठ्या संख्येतील कार्यकर्त्यांनीही गेटकडे धाव घेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काही काळ मंदिर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, एकीकडे सर्वसामान्य भाविकांना विठ्ठल दर्शनासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असताना, दुसरीकडे व्हीआयपी दर्शनामुळे मिळणाऱ्या विशेष सुविधांवर नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे व्हीआयपी दर्शन व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande