
सोलापूर, 19 मे, (हिं.स.)। सध्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व घरयादी गटांमध्ये जनगणनेचे काम सुरू असून, दिनांक 16 मे 2026 व 17 मे 2026 रोजी सहसंचालक जनगणना कार्यालय मुंबई रमेश भोसले, सांख्यिकी अधिकारी जनगणना संचालनालय मुंबई अजित भांड तसेच सहाय्यक महसूल अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर प्रवीण पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील विविध चार्ज कार्यालयांना भेट देऊन जनगणना कामकाजाचा आढावा घेतला.यावेळी पंढरपूर तहसिल कार्यालय, माळशिरस तहसिल कार्यालय, अक्कलकोट तहसिल कार्यालय, उत्तर सोलापूर तहसिल कार्यालय, दक्षिण सोलापूर तहसिल कार्यालय तसेच अक्कलकोट नगरपालिका, दुधनी नगरपालिका, मैंदर्गी नगरपालिका, पंढरपूर नगरपालिका, म्हाळुंग श्रीपूर नगरपालिका, अकलूज नगरपालिका, नातेपुते नगरपालिका, माळशिरस नगरपालिका आणि सोलापूर महानगरपालिका येथील चार्ज कार्यालयांना भेटी देण्यात आल्या.
अधिकाऱ्यांनी जनगणना कामकाजाबाबत पर्यवेक्षक व प्रगणकांना मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या शंकांचे निरसन केले. याशिवाय HLB ना भेट देऊन जनगणना कामासाठी घरांना देण्यात आलेल्या क्रमांकांची पाहणी करण्यात आली. पर्यवेक्षक व प्रगणकांनी केलेल्या कामाचे अधिकाऱ्यांनी कौतुकही केले.सध्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व घरयादी गटांमध्ये जनगणनेचे काम सुरू असून प्रगणकांकडून कच्चा नकाशा (Draft Layout Map) तयार करणे तसेच घरांचे क्रमांक निश्चित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. जनगणना कार्यालयाकडून प्राप्त सूचनांनुसार दिनांक 20 मे 2026 पासून क्षेत्रीय कामास (Field Work) सुरुवात करण्यात येणार आहे.आजअखेर सोलापूर जिल्ह्यात एकूण 5 हजार 454 घरयादी गट असून त्यापैकी 502 घरयादी गटांमध्ये प्रत्यक्ष HLO App द्वारे कामास सुरुवात झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड