सोलापूर विधान परिषदेसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची चर्चा
सोलापूर, 19 मे, (हिं.स.)। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला असून, तब्बल चार वर्षांनंतर ही निवडणूक होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर भारतीय जनता पार्टीने वर्चस्व प्रस्थापित
bjp


सोलापूर, 19 मे, (हिं.स.)। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला असून, तब्बल चार वर्षांनंतर ही निवडणूक होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर

भारतीय जनता पार्टीने वर्चस्व प्रस्थापित केल्याने या जागेवर भाजपचाच उमेदवार विजयी होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे आता भाजपची उमेदवारी नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.या निवडणुकीसाठी २५ मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून, १ जून ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने २०२२ पासून ही निवडणूक प्रलंबित होती. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका आणि अनेक नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त असल्याने विधान परिषद निवडणूक होऊ शकली नव्हती. मात्र, डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्याने आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.या मतदारसंघात एकूण सुमारे ५५५ मतदार आहेत. त्यापैकी एकट्या भाजपचे सुमारे ३१३ मतदार असल्याचे मानले जाते. शिवसेनेचे ६६ आणि

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २७ मतदार मिळून महायुतीचे एकूण संख्याबळ ४०६ पर्यंत पोहोचते. म्हणजेच जवळपास ७४ टक्के मतदार महायुतीकडे असल्याने विरोधकांची स्थिती अत्यंत कमकुवत मानली जात आहे.विजय जवळपास निश्चित मानला जात असल्याने भाजपमध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस सुरू झाली आहे. इच्छुक मेदवारांनी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार लॉबिंग सुरू केल्याचीचर्चा आहे.दरम्यान,

माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारसंघातील सोलापूर जिल्ह्याबाहेरील एका बड्या नेत्याचे नावही चर्चेत आले होते. याबाबत पालकमंत्री जयकुमार गो-हे यांना विचारले असता, बाहेरचा-जिल्ह्यातला असा वाद निर्माण करण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, माजी खासदार

रणजितसिंह नाईक निंबळकर यांच्या नावाचीही उमेदवारीसाठी जोरदार चर्चा सुरू असून, ऐनवेळी भाजपकडून धक्कातंत्र वापरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande