कृषी सहायकांनी प्रत्यक्ष फिल्डवर जावे - पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर, 02 मे (हिं.स.)। कृषी सहायकांनी शेतकऱ्यांचे पीक उत्पादन पद्धती व आर्थिक उत्पन्न वाढीबाबत प्रबोधन करावे त्यासाठी प्रत्यक्ष फिल्डवर जावे असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले . गारगोटी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात राधान
खरीप हंगाम कृषी खात्याची आढावा बैठक


कोल्हापूर, 02 मे (हिं.स.)। कृषी सहायकांनी शेतकऱ्यांचे पीक उत्पादन पद्धती व आर्थिक उत्पन्न वाढीबाबत प्रबोधन करावे त्यासाठी प्रत्यक्ष फिल्डवर जावे असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले .

गारगोटी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात राधानगरी , भुदरगड,आजरा तालुक्यातील खरीप हंगाम 2026 - 27 च्या अनुषंगाने नियोजन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगारे , उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील तालुका कृषी अधिकारी सर्वश्री महादेव खुडे ( भुदरगड ) एकनाथ गुरव ( राधानगरी ) दीपक मुळे ( आजरा ) आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांचे शाश्वत आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी त्यांना वेगवेगळे कृषी पीक उत्पादन घेण्याबाबत प्रयोग करण्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रवृत्त करावे. तसेच या तिन्ही तालुक्यात आजपर्यंत किती माती नमुने घेतलेत ? याची विचारनाही त्यांनी केली. आगामी पंधरा दिवसात कृषी आयुक्तांना गारगोटीमध्ये निमंत्रित करावे असे निर्देशही त्यांनी याप्रसंगी दिले

यावेळी तिन्ही कृषी अधिकाऱ्यांनी सन 2026-27 या वर्षातील खरीप नियोजनाचा आराखडा सादर करून सन 2025 - 26 या वर्षात कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या विविध लाभांबाबत प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande