
लातूर, 02 मे (हिं.स.)।
रितेश देशमुख यांनी आज लातूरकरांना खास आवाहन करत राजा शिवाजी हा चित्रपट सर्वांनी पाहावा असे सांगितले.लातूर शहरात छत्रपति शिवाजी महाराज यांना नमन करून बोलताना त्यांनी छत्रपतींच्या इतिहासाची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा चित्रपटांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
रितेश देशमुख म्हणाले की, “छत्रपतींचा पराक्रम, त्यांचे नेतृत्व आणि स्वराज्याची संकल्पना प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचली पाहिजे. ‘राजा शिवाजी हा चित्रपट त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.”
या वक्तव्यामुळे लातूरमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली असून, चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहांकडे वळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis