रितेश-जेनेलिया दांपत्याने घेतले तुळजाभवानीचे दर्शन.
लातूर, 02 मे (हिं.स.)। राजा शिवाजी’ चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर रितेश-जेनेलिया देशमुख दांपत्याने घेतले तुळजाभवानीचे दर्शन. तुळजापूर ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे औचित्य साधत अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख या दांपत्
रितेश देशमुख


लातूर, 02 मे (हिं.स.)।

राजा शिवाजी’ चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर रितेश-जेनेलिया देशमुख दांपत्याने घेतले तुळजाभवानीचे दर्शन.

तुळजापूर ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे औचित्य साधत अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख या दांपत्याने महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले.

यावेळी दोघांनी श्री तुळजाभवानी मंदिरात मनोभावे पूजा करून देवीचे आशीर्वाद घेतले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाच्या निमित्ताने देशमुख दांपत्य तुळजापुरात आले होते. दर्शनानंतर चाहत्यांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande