
अकोला, 02 मे (हिं.स.)/ महाराष्ट्र दिन, बुद्ध जयंती व कामगार दिनाचे औचित्य साधून जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मोरणा नदीवर ‘जलयुक्त शिवार’ बंधाऱ्याचे भूमिपूजन आज मोठ्या उत्साहात पार पडले.
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश भाऊ फुंडकर, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारे व अकोला पूर्वचा विकासाचा संकल्प घेऊन कार्यरत आमदार रणधीर भाऊ सावरकर आणि शेतकरी, ग्रामीण भाग व युवाशक्तीचे प्रेरणास्थान असलेले अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनुप भाऊ धोत्रे यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी अंबादास उमाळे, दक्षिण मंडळ अध्यक्ष संजय कोरडे, रवी गावंडे, गणेश अंधारे, वैकुंठ ढोरे, राजू ठाकरे, विठ्ठल चतरकर, कडू साहेब, विजय डाबेराव, देविदास बोदडे, वासुदेव रोकडे, करण ठाकूर, वैभव माहोरे, प्रवीण कोकाटे, गणेश वाणरे, मनोर रोकडे, शाम शेळके, निलेश मालोकार, अंकुश इंगळे, नारायण बोर्डे, हर्षल गोंडचवर, अण्णासाहेब इंगळे, गणेश इंगळे, साहेबराव इंगळे, रमेश इंगळे, निळकंठ इंगळे, सुरेश इंगोले, गोपाल इंगळे, आनंद इंगळे, जनार्दन इंगळे, केशव इंगळे, मनोहर सातारकर, दिलीप इंगळे, गजानन काळे, ज्ञानेश्वर इंगळे, शंकर इंगळे, शंकर तांबे आदी पदाधिकारी, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर म्हणाले,* “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार योजनेतून मोरणा नदीचे खोलीकरण, रुंदीकरण व सिमेंट बंधाऱ्यांमुळे भूजल पातळी 2 ते 3 मीटरने वाढेल. चांगेफळसह 10 गावांतील शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन बारमाही सिंचनाखाली येईल.”
आमदार रणधीर सावरकर म्हणाले, “अकोला पूर्वच्या प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोहोचवणे हा माझा संकल्प आहे. गॅबियन बंधारे, सलग समतल चर व रिचार्ज शाफ्टमुळे खरीप-रब्बी दोन्ही हंगाम हमखास होतील. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे.”
खासदार अनुप धोत्रे म्हणाले, “बुद्ध जयंतीच्या शांततेचा व कामगार दिनाच्या श्रमसन्मानाचा संदेश घेऊन शेतकरी, ग्रामीण मातृशक्ती व युवकांच्या कल्याणासाठी केंद्र-राज्य सरकार एकत्र काम करत आहे. या बंधाऱ्यामुळे पिण्याचे पाणी व जनावरांसाठीही पाणी उपलब्ध होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे