अकोला - आ. साजिद खान पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर
अकोला, 02 मे, (हिं.स.)। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त महानगर युवक काँग्रेसच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमासाठी नगरसेवक आकाश कवडे यांनी विशेष पुढाकार
Photo


अकोला, 02 मे, (हिं.स.)। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त महानगर युवक काँग्रेसच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमासाठी नगरसेवक आकाश कवडे यांनी विशेष पुढाकार घेतला होता. शनिवारी (ता. २ मे) स्थानिक स्वराज्य भवन येथे पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून ५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

उन्हाळ्याच्या कडाक्याच्या उष्णतेतही हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. विशेषतः आकाश कवडे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध तयारी करून शिबिराची यशस्वी अंमलबजावणी केली. उन्हाळ्यात भासणारी रक्ताची कमतरता लक्षात घेता, रुग्णांना वेळेवर मदत व्हावी हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. या शिबिरात साई ब्लड बँकेच्या कर्मचारी वर्गाने रक्त संकलनासाठी मोलाचे सहकार्य केले. रक्तदात्यांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. शिबिरादरम्यान उत्साही वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी कपिल रावदेव, राहुल सारवान, सोहेल पठाण, मोहम्मद शारिक, अंकुश तायडे, विजय जामनिक, अभिजीत तवर, अंकुश गावंडे, इसराइल खान, शेख हर्षद, मुकुंद सरनायक, संतोष निधाने, ऋषिकेश जामोद्दे, राम कोकाटे, सोहम गवई, तेजस देवबाले, शुभम हिरळकर, अंकुश भेंडेकर, विजय चिरावंडे, सोनू भाई यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याची समाजाभिमुख परंपरा जपली जात असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली, तर आकाश कवडे यांच्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande