तिरुपती-अकोला-तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेसचा भव्य शुभारंभ!
अकोला, 02 मे (हिं.स.)। विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा व आंध्र प्रदेशला जोडणाऱ्या व औंढा नागनाथ, नांदेड, तिरुपती या तीर्थस्थळांना एका सूत्रात बांधणाऱ्या रेल्वे क्र. 17429/17430 तिरुपती-अकोला-तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेसचा भव्य शुभारंभ व हिरवा झेंडा दाखवण
तिरुपती-अकोला-तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेसचा भव्य शुभारंभ!


अकोला, 02 मे (हिं.स.)।

विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा व आंध्र प्रदेशला जोडणाऱ्या व औंढा नागनाथ, नांदेड, तिरुपती या तीर्थस्थळांना एका सूत्रात बांधणाऱ्या रेल्वे क्र. 17429/17430 तिरुपती-अकोला-तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेसचा भव्य शुभारंभ व हिरवा झेंडा दाखवण्याचा कार्यक्रम शनिवार, दिनांक 3 मे 2026 रोजी सकाळी 8:00 वाजता अकोला रेल्वे स्टेशनवर होणार आहे.

खासदार अनुप भाऊ धोत्रे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ होईल. या कार्यक्रमाला आमदार रणधीर सावरकर, महापौर शारदाताई खेडकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, विजय अग्रवाल, जयंत मसने, संतोष शिवरकर, अमोल गोगे, वसंत बाछुका, ॲड. सुभाष सिंग ठाकूर, उमेश मालू, ॲड. अमोल इंगळे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य निकेश गुप्ता, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे गिरीश जोशी, माधव मानकर, राजेंद्र गिरी, शरद तुरकर, तिरुपती बालाजी भक्त मंडळाचे अध्यक्ष संदीप गावंडे, भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व रेल्वे प्रवासी संघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

खासदार अनुप धोत्रे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वात देशभरात रेल्वे सुविधा वाढत आहेत. तिरुपती, औंढा नागनाथ, नांदेड ही तीर्थस्थळे जोडणारी ही गाडी मध्य भारताला दक्षिण व उत्तर भारताशी जोडणारा सेतू ठरेल. अकोलेकरांसाठी अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे.”

या साप्ताहिक एक्सप्रेसमुळे अकोला, वाशिम, हिंगोली, औंढा नागनाथ, परभणी, नांदेड, निजामाबाद, सिकंदराबाद मार्गे थेट तिरुपती गाठता येणार आहे. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी व भाविकांना याचा मोठा लाभ होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या व मध्य भारताला उत्तर-दक्षिणेशी जोडणाऱ्या अनेक नव्या गाड्या सुरू केल्या आहेत. खासदार अनुप धोत्रे यांच्या सक्रिय पाठपुराव्यामुळे अकोल्याला ही ऐतिहासिक सुविधा मिळाली आहे.

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अकोलेकरांनी मोठ्या संख्येने 3 मे रोजी सकाळी 8:00 वाजता अकोला रेल्वे स्टेशनवर उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande