नांदेड जिल्ह्यात बारावीचे ७७.७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
नांदेड, 02 मे (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. या निकालात नांदेड जिल्ह्याने ७७.७० टक्के यशाची नोंद केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी करत निकाल
नांदेड जिल्ह्यात बारावीचे ७७.७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण


नांदेड, 02 मे (हिं.स.)।

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. या निकालात नांदेड जिल्ह्याने ७७.७० टक्के यशाची नोंद केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी करत निकालात आपले वर्चस्व कायम राखले आहे.

निकालाच्या आकडेवारीनुसार, नांदेड जिल्ह्यात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८४.६१ टक्के इतके आहे, तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७१.७४ टक्के आहे. यावरून बारावीच्या परीक्षेत मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.

निकालात १५ टक्क्यांची घसरणगेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नांदेड जिल्ह्याच्या निकालात मोठी घट पाहायला मिळाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निकालाचा टक्का १५ टक्क्यांनी घसरला असल्याने शिक्षण क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.

जिल्ह्यात तालुकानिहाय निकालाचा विचार करतासर्वाधिक निकाल: अर्धापूर तालुक्याने ९४ टक्के निकालासह जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.सर्वात कमी निकाल: कंधार तालुक्याचा निकाल सर्वात कमी म्हणजे ६३.१६ टक्के लागला आहे.

जिल्ह्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, कमी निकाल लागलेल्या भागांत निकालाच्या घसरणीची कारणे शोधली जात आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande