तीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचारानंतर नरसापुरात संतप्त ग्रामस्थांचा मोर्चा
पुणे, 02 मे, (हिं.स.)। भोर तालुक्यातील नरसापुर गावात तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण आहे. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मोठा आक्रोश मोर्चा काढत आरोपीला कठो
gsdf


पुणे, 02 मे, (हिं.स.)। भोर तालुक्यातील नरसापुर गावात तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण आहे. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मोठा आक्रोश मोर्चा काढत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. गावातील वातावरण तणावपूर्ण असून संपूर्ण नरसापूर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६५ वर्षीय भीमा कांबळे या वृद्ध व्यक्तीवर तीन वर्षांच्या चिमुकलीला जनावरांच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या अत्याचारानंतर चिमुकलीचा मृत्यू झाल्याने गावात संतापाची लाट उसळली. घटनेची माहिती समोर येताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.

ग्रामस्थांनी नरसापूर ग्रामपंचायत कार्यालयापासून पुणे-सातारा महामार्गापर्यंत मोर्चा काढला. संतप्त नागरिकांनी आरोपीला ग्रामस्थांच्या ताब्यात देण्याची मागणीही केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande