नाशिक विभागाचा निकाल 92.72 टक्के; यावर्षी एक टक्क्याने निकाल घसरला
नाशिक, 02 मे, (हिं.स.) - नाशिक माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल ९०.७२ टक्के लागला असून मागील वर्षाच्या तुलनेमध्ये सरासरी एक टक्का निकाल हा कमी लागला आहे यामध्ये सुद्धा सर्वात जास्त निकाल नंदुरबार
नाशिक विभागाचा निकाल 92.72 टक्के; यावर्षी एक टक्क्याने निकाल घसरला


नाशिक, 02 मे, (हिं.स.) - नाशिक माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल ९०.७२ टक्के लागला असून मागील वर्षाच्या तुलनेमध्ये सरासरी एक टक्का निकाल हा कमी लागला आहे यामध्ये सुद्धा सर्वात जास्त निकाल नंदुरबार जिल्ह्याचा लागला आहे. संपूर्ण राज्यामध्ये नाशिक विभागाचा निकाल हा चौथ्या स्थानी आहे.

नाशिक माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीची परीक्षा मार्च 2026 मध्ये घेण्यात आली होती या परीक्षांचा निकाल शनिवारी नाशिक माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घोषित करण्यात आला या निकालामध्ये सर्वात जास्त निकाल नंदुरबार जिल्ह्याचा लागला असून सर्वात कमी निकाल हा जळगाव जिल्ह्याचा लागलेला आहे. संपूर्ण नाशिक विभागाचा निकाल हा 90.72 टक्का लागला आहे मागील वर्षी म्हणजे वीस ते पंचवीस मध्ये नाशिक विभागाचा निकाल हा 91.31 टक्के होता म्हणजे यावर्षी सरासरी 1 टक्का निकाल हा कमी लागला आहे.

नाशिक विभागाअंतर्गत नाशिक जिल्ह्यामधून 76 हजार 748 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 71 हजार 720 मुलं हे उत्तीर्ण झाले आहेत नाशिक जिल्ह्याचा निकाल हा 93.44 टक्का लागला आहे धुळे जिल्ह्यामध्ये 22 हजार 993 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 20 हजार 620 मुलं हे उत्तीर्ण झाले आहेत . धुळे जिल्ह्याचा निकाल 89.67 टक्के लागला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये 44 हजार 868 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 38 हजार 174 मुलं उत्तीर्ण झालेले आहेत म्हणजे जळगाव जिल्ह्याचा निकाल हा 85.8 टक्के लागलेला आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये 17 हजार 203 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 16285 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वाधिक म्हणजेच 94.66 टक्के निकाल लागल्याचे नाशिक परीक्षा मंडळाच्या वतीने घोषित करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande