
बीड, 02 मे, (हिं.स.)। परळी येथे लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांची गेवराई विधानसभा मतदारसंघाचे भाजपा नेते बाळराजे दादा पवार यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान गेवराई शहर व मतदारसंघातील प्रलंबित विविध विकास कामे विविध सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा बाळराजे दादा पवार यांनी केली जनहिताच्या कामांना गती देण्यासाठी ही भेट अत्यंत सकारात्मक ठरली यावेळी दादांसोबत बांधकाम सभापती राजेंद्र राक्षसभुवनकर माजी नगराध्यक्ष सुशील जवजाळं उपस्थित होते.
गेवराई विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. गेवराई येथील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवा आणि यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis