सोलापूर - पाईपलाईन फुटल्यामुळे पाणीपुरवठा ठप्प; लाखो लिटर पाणी वाया
सोलापूर, 02 मे, (हिं.स.)। मनोहर सांस्कृतिक भवन परिसरात मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईनला भगदाड पडल्याने संबंधित भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. आधीच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांसाठी ही घटना अधिकच डोकेदुखी ठरली आहे. एकीकडे रोटेशननुस
fgdf


सोलापूर, 02 मे, (हिं.स.)। मनोहर सांस्कृतिक भवन परिसरात मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईनला भगदाड पडल्याने संबंधित भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. आधीच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांसाठी ही घटना अधिकच डोकेदुखी ठरली आहे.

एकीकडे रोटेशननुसार पाणीपुरवठा सुरू असताना अचानक पाईपलाईन फुटल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली असून “दुष्काळात तेरावा महिना” अशी अवस्था निर्माण झाली आहे. गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर वाहून जात असून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र आहे.या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे. पाण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या नागरिकांसमोर अशा प्रकारे होणारी नासाडी ही गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त होत आहे.दरम्यान, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले की, सध्या सुरू असलेला पुरवठा पूर्ण झाल्यानंतर संबंधित लाईन बंद करून तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेतली जातील. तोपर्यंत काही काळ पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande