खरात आर्थिक व्यवहार प्रकरणी रूपाली चाकणकरांच्या बहिणी आणि भाच्याला समन्स
नाशिक, 02 मे (हिं.स.)। - भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकरांची बहीण व भाच्याची चौकशी करण्यासाठी एटीएसने समाज पाठविला असून पुढच्या आठवड्यामध्ये दोघांनाही एटीएस समोर हजर राहण्यास सांगितले आहे. या चौकशीतून काय माहिती समोर येते याकडे सर्वां
खरात आर्थिक व्यवहार प्रकरणी रूपाली चाकणकरांच्या बहिणी आणि भाच्याला समन्स


नाशिक, 02 मे (हिं.स.)।

- भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकरांची बहीण व भाच्याची चौकशी करण्यासाठी एटीएसने समाज पाठविला असून पुढच्या आठवड्यामध्ये दोघांनाही एटीएस समोर हजर राहण्यास सांगितले आहे. या चौकशीतून काय माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

15 मार्च रोजी नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या वतीने नाशिक मधील भोंदू बाबा अशोक खरात याला त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली होती आत्तापर्यंत भोंदू बाबा अशोक खरात वरती संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत त्यापैकी नाशिकमध्ये नऊ महिलांनी लैंगिक अत्याचार व फसवणुकी संदर्भातले गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. गुन्हाची संख्या वाढत असल्याचे लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्यातील महिला आयपीएस अधिकारी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र एसआयटीची पथकाची स्थापना केली आणि या पथकाच्या वतीने या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला.

भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी संबंध असल्याच्या कारणावरून राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांना सातत्याने टिकेचे धनी व्हावी लागले आणि त्यानंतर त्यांनी तडका फडके आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला पक्षाचे राज्य महिला अध्यक्ष पदही त्यांनी सोडून दिले होते. हे सर्व घडल्यानंतरही रूपाली चाकणकर यांचा या प्रकरणातील तपास संदर्भात सातत्याने चर्चा होत होती या दरम्यान मागील आठवड्यामध्ये रूपाली चाकणकर या नाशिक दौऱ्यावरती आल्या होत्या त्या सिन्नर तालुक्यातील डुबेर या गावी जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि आपण राजकारणात सक्रिय असल्याचे दाखविले होते.

हे सर्व घडत असताना मधल्या काळामध्ये अहिल्यानगर येथील तपासामध्ये शिर्डी पोलिसांमध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासात अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भरती यांनी रूपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा याला पोलिसांनी त्यावेळी चौकशीसाठी बोलावले होते बँकेत असलेल्या पैशांबाबत चौकशी करण्यात आली आता पुन्हा एकदा या सर्व प्रकरणांमध्ये एसआयटी म्हणजे विशेष पोलीस पथकाने रूपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा या दोघांना आर्थिक व्यवहारासह अजून काही माहिती गोळा करण्यासाठी म्हणून पुढील आठवड्यात एसआयटी समोर हजर राहण्याचे समन्स बजावले आहे त्यामुळे आता हे दोघेजण कधी हजर होतात आणि त्यातून काय माहिती मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande