नांदेड - जनगणना-२०२७ उपक्रमाच्या सेल्फी पॉइंटचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नांदेड, 02 मे (हिं.स.)। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे जनगणना-२०२७ उपक्रमाच्या सेल्फी पॉइंटचे उद्घाटन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी स्वतः स्वगणना करून या राष्ट्रीय उपक्रमात सहभाग नोंदवला. देशात जनगणना-२०२७ च
अ


नांदेड, 02 मे (हिं.स.)। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे जनगणना-२०२७ उपक्रमाच्या सेल्फी पॉइंटचे उद्घाटन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी स्वतः स्वगणना करून या राष्ट्रीय उपक्रमात सहभाग नोंदवला.

देशात जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्यातील स्व-गणना प्रक्रिया सुरू झाली आहे. १ ते १५ मे २०२६ या कालावधीत सर्व नागरिकांना se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर आपल्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन स्वतः भरता येईल.त्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान घरनोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande