ठाण्यात महिला राईड डे उत्साहात साजरा
ठाणे, 02 मे, (हिं.स.) - राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात जागतिक महिला राईड डे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संघर्ष च्या महिलाध्यक्षा ऋताताई आव्हाड उपस्थित होत्या. महिलांना दुचाकी चालविण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्
महिला राईड डे उत्साहात साजरा


ठाणे, 02 मे, (हिं.स.) - राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात जागतिक महिला राईड डे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संघर्ष च्या महिलाध्यक्षा ऋताताई आव्हाड उपस्थित होत्या.

महिलांना दुचाकी चालविण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने 2 मे हा इंटरनॅशनल फिमेल राईड डे म्हणून जगभरात साजरा करण्यात येत असतो. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी महिला काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या उपाध्यक्षा मेघना शेट्टी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी महिलांनी सुपर बाईकवर फेरी मारून जल्लोष केला.

या कार्यक्रमास ऋताताई आव्हाड यांच्यासह प्रख्यात बाईक राईडर रोशनी पाटील - जैन, मनमित, प्रशिक्षक अंजली वर्तक आदी उपस्थित होते. या सर्वांनी महिलांना दुचाकी चालविण्यासाठी प्रोत्साहपर मार्गदर्शन केले. तर, ऋताताई आव्हाड यांनी सांगितले की, पूर्वी महिला अवलंबित होत्या. घरात दुचाकी असतानाही महिलांना कुठेही जाण्यासाठी पुरूषांची वाट पहावी लागत असे. मात्र, आता परिस्थिती बदलत असून अनेक महिला दुचाकीवरून थेट लेह-लद्दाख गाठत आहेत. हा बदल नक्कीच स्पृहणीय आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande