सेलूत 72 प्रगणक 13 पर्यवेक्षक करताहेत घरगणना : जनगणनेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन
परभणी, 20 मे (हिं.स.)। जनगणनेतून जनकल्याण या उद्देशाने 16 वी जनगणना - 2027 ला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. सेलू नगर परिषदेच्या वतीने शनिवार 16 मे पासून घरगणनेला सुरुवात करण्यात आली असून याकरीता 72 प्रगणक 13 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आ
सेलूत 72 प्रगणक 13 पर्यवेक्षक करताहेत घरगणना : जनगणनेसाठी सहकार्य करा : नगर परिषदेद्वारे नागरीकांना आवाहन


परभणी, 20 मे (हिं.स.)।

जनगणनेतून जनकल्याण या उद्देशाने 16 वी जनगणना - 2027 ला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. सेलू नगर परिषदेच्या वतीने शनिवार 16 मे पासून घरगणनेला सुरुवात करण्यात आली असून याकरीता 72 प्रगणक 13 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सुरवातीला तीन टप्प्यांत प्रगणक आणि पर्यवेक्षकांना जनगणनेसाठी प्रशिक्षण देण्यात आले. आपल्या हक्काच्या उन्हाळी सुट्ट्या बाजूला सारून शिक्षक 43 अंश सेल्सिअस तापमानातही आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहेत. नगर परिषद प्रशासनाने जनगणनेसाठी 72 प्रगणक आणि 13 पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. पहिल्या टप्प्यात 16 मे ते 14 जून या कालावधीत घरगणना होणार आहे. पहिल्यांदाच ही जनगणना ऑनलाईन होणार आहे. शहरातील जनतेने आपल्या घरी आलेल्या शिक्षक - प्रगणक, पर्यवेक्षकांना जनगणनेसाठी सहकार्य करावे. शासनाने जणगननेसाठी नियुक्त केलेले सर्व अधिकारी व कर्मचारी अनुभवी प्रशिक्षीत व जबाबदार आहेत. त्यामुळे ते विचारत असलेल्या प्रश्नांना योग्य उत्तरे द्यावीत, नागरीकांची संकलीत केल्या जाणार्या माहितीची गुप्तता पाळण्या बाबत सर्वसंबंधितांना आदेशीत करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी निःसंकोचपणे कर्मचार्यांना माहिती सांगावी, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा चार्ज जनगणना अधिकारी महेश गायकवाड, अतिरिक्त चार्ज जनगणना अधिकारी विजय शहाणे, नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी भगवान चव्हाण यांनी केले आहे.

जनगणनेच्या नोंदणीसाठी आवश्यक किटचे वाटप नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले. या प्रसंगी किशोर कटारे, सुभाष मोहकरे, डॉ. सुरेश हिवाळे,पवन गिराम, भगवान पावडे, गजानन मुळी आणि प्रगणक, पर्यवेक्षक उपस्थित होते. जनगणना लिपिक नंदकिशोर दायमा, पुरूषोत्तम चोबे, तांत्रिक सहायक हर्षवर्धन शिंदे, अक्षय कदम, रंगरेज अन्सारी, आनंद काबरा हे नगर परिषदेचे कर्मचारी प्रगणक, पर्यवेक्षकसह जनगणना यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

जणगणनेसाठी प्रगणकांना सहकार्य करण्याचे आवाहन...

आपल्या शहरात पहिल्या टप्प्यात प्रगणक घर नोंदणीसाठी येत आहेत. जनगणना करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. ज्यांनी स्वगणना केली असेल त्यांनी आपल्या घरी आलेल्या प्रगणकास आपला स्वगणना क्रमांक द्यावा. घर गणनेचे काम पूर्णत्वाकडे असून प्रत्यक्ष जनगणनेच्या कार्याला देखील ऑनलाईन पद्धतीने प्रारंभ झाला आहे. आपल्या घरी आलेल्या शिक्षक प्रगणकास जनगणनेसाठी सकारात्मक प्रतिसाद देऊन आपली नोंदणी करावी. असे आवाहन अतिरिक्त चार्ज जनगणना अधिकारी विजय शहाणे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande