महंत सुकेणेकर बाबांच्या अंत्यदर्शनाला लोटला जनसागर
निफाड. , 21 मे (हिं.स.)। अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष आणि महानुभाव पंथाचे अष्टपैलू मार्गदर्शक दिवंगत महंत सुकेणेकर बाबा यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथे अत्यंत शोकाकुल आणि भावुक वातावरणात अं
A huge crowd gathered


A huge crowd gathered


निफाड. , 21 मे (हिं.स.)। अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष आणि महानुभाव पंथाचे अष्टपैलू मार्गदर्शक दिवंगत महंत सुकेणेकर बाबा यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथे अत्यंत शोकाकुल आणि भावुक वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. महानुभाव पंथाचा हा 'ज्ञानसूर्य' मावळल्याची भावना मनात ठेवून त्यांच्या अंतिम दर्शनासाठी नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून आणि परराज्यातून हजारो महानुभाव पंथीय महंत, संत आणि भाविकांचा जनसागर उसळला होता. बाबांच्या जाण्याने संपूर्ण महानुभाव पंथ आज पोरका झाला आहे.

महंत सुकेणेकर बाबांचे बुधवारी मौजे सुकेणे येथील दत्त मंदिरातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले होते. त्यांचे पार्थिव सर्वसामान्यांच्या व भाविकांच्या अंतिम दर्शनासाठी मंदिरात ठेवण्यात आले होते. आज गुरुवारी सकाळी नऊ वाजता 'कृष्ण कन्हैया लाल की जय' आणि नामस्मरणाच्या जयघोषात त्यांच्या अंत्ययात्रेला प्रारंभ झाला. मौजे सुकेणे ते ओने रस्त्यावरील महानुभाव स्मशानभूमीत, महानुभाव पंथाच्या शास्त्रोक्त विधीनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्काराच्या वेळी मौजे सुकेणे ग्रामस्थांच्या वतीने आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी बाबांच्या पवित्र स्मृतीस श्रद्धांजली वाहिली. यामध्ये

, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत कविश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबा, उपाध्य आचार्य महंत बीडकर बाबा, मविप्र सरचिटणीस ॲड . नितीन ठाकरे , उपसभापती डी. बी. मोगल, सचिन पिंगळे, इंजि. प्रणव पवार, मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, आमदार दिलीप बनकर, श्याम कदम, गोरख ढगे, दिनकर पाटील, लक्ष्मण जायभावे, दत्ताजी गायकवाड, दिगंबर गीते, ॲड. प्रकाश घुगे, संपतराव डुंबरे, प्राचार्य राजेंद्र निकम, अरुण भोजने, साहेबराव महानुभाव, संतोषमुनी कपाटे, यतीन कदम, माजी आमदार बाळासाहेब सानप, खंडू बोडके , प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर आदींचा समावेश होता. बाबांच्या निधनामुळे महानुभाव पंथाने एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला, समाजाला दिशा देणारा थोर संत गमावला आहे. ही पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशा शब्दांत मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी महानुभाव पंथातील सर्वोच्च आचार्य आणि महंतांची उपस्थिती होती. आचार्य महंत बिडकर बाबा, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत कविश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबा, महंत चिरडे बाबा, महंत मराठे बाबा, महंत मोठे बाबा आंबेवडगावकर, महंत सैंगराज बाबा शेवलीकर या प्रमुख संतांसह हजारो भाविकांनी साश्रू नयनांनी बाबांना अंतिम निरोप दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande