
परभणी, 21 मे (हिं.स.)। महानगरपालिकेच्या वतीने शहरातील बाजारपेठ परिसरात प्लास्टिक बंदी मोहिमेअंतर्गत धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान अंदाजे 15 ते 20 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून संबंधित व्यापार्यांकडून 8 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
उपायुक्त यांच्या आदेशानुसार तसेच मुख्य स्वच्छता निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती ‘अ’ अंतर्गत ही मोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान भाजीपाला विक्रेते व इतर व्यापार्यांची तपासणी करून प्लास्टिक वापर करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत लक्ष्मण जोगदंड, कुणाल भारसाकळे, दिलीप वाहुळे यांच्यासह सफाई कर्मचार्यांनी सहभाग घेतला. महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे प्लास्टिक वापरणार्या व्यापार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis