
रत्नागिरी, 20 मे (हिं.स.) । साखळोली (ता. दापोली) येथे आज, बुधवार दि. २० मे रोजी दुपारी एका इको गाडीची आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले असून आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, साखळोली येथील वळणाच्या रस्त्यावर हा अपघात घडला. इको गाडी आणि समोरून येणारी दुचाकी एकमेकांना अत्यंत वेगाने धडकल्याने हा अपघात झाला. अपघाताचा आवाज होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी आणि पादचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली व जखमींच्या मदतीसाठी शर्थीचे प्रयत्न केले.
नागरिकांनी प्रसंगावधान राखून गंभीर जखमी झालेल्या दोन्ही दुचाकीस्वारांना तातडीने उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघात प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस यंत्रणेने घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी