पंढरपुरात अधिक मासात भाविकांची गर्दी; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
सोलापूर, 20 मे (हिं.स.)। अधिक मासानिमित्त देशभरातून हजारो भाविकश्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरयेथे दर्शनासाठी दाखल होत असताना, मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात मोबाईलवरून चोरून चित्रीकरण करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रका
पंढरपुरात अधिक मासात भाविकांची गर्दी; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह


सोलापूर, 20 मे (हिं.स.)। अधिक मासानिमित्त देशभरातून हजारो भाविकश्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरयेथे दर्शनासाठी दाखल होत असताना, मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात मोबाईलवरून चोरून चित्रीकरण करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला स्वच्छतागृहात गेली असता तिला एका तरुणाने भिंतीवर चढून मोबाईलद्वारे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करताना दिसला. संबंधित महिलेने आरडाओरड करताच तो तरुण घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना बोलावून या प्रकाराची माहिती देण्यात आली.

विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीही अशाच प्रकारची घटना घडली होती. त्या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा अशी घटना घडल्याने पोलीस, मंदिर प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.महिला स्वच्छतागृहांचा वापर देशभरातून येणाऱ्या महिला भाविक आणि पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणावर केला जातो. अशा ठिकाणी चोरून चित्रीकरणाचे प्रकार घडू लागल्याने महिला आणि लहान मुलींच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, परिसरात काही तरुण अमली पदार्थ आणि मद्याचे सेवन करून वावरत असल्याचाही आरोप संबंधित महिलांनी केला आहे. या प्रकारानंतर मंदिर परिसरातील सुरक्षा वाढविण्याची आणि महिला स्वच्छतागृहांवर विशेष देखरेख ठेवण्याची मागणी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande