धाराशिव येथे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन
धाराशिव, 20 मे (हिं.स.)। अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३२ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन येत्या दि. २९ व ३० मे रोजी लोकनेते अजितदादा पवार साहित्य नगरी, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, धाराशिव येथे मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वर
Q


धाराशिव, 20 मे (हिं.स.)।

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३२ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन येत्या दि. २९ व ३० मे रोजी लोकनेते अजितदादा पवार साहित्य नगरी, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, धाराशिव येथे मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात संपन्न होणार आहे..

या पार्श्वभूमीवर रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेची आढावा बैठक पार पडली. बैठकीत संमेलनाच्या विविध नियोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली..

याबैठकीत आमदार कैलास पाटील यांची संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन दि. २९ मे रोजी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते होणार असून राज्यभरातील नामवंत साहित्यिक, कवी, लेखक, विचारवंत आणि नवोदित साहित्यिकांची उपस्थिती लाभणार आहे.

दरम्यान, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांना मरणोत्तर “साहित्य जीवनगौरव पुरस्कार” प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कारामध्ये रुपये ५१ हजार रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्हाचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे, प्रा. भास्कर चंदनशिव यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दरवर्षी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या साहित्यिकाला प्रदान करण्यात येणार आहे.

राज्यभरातील नामवंत साहित्यिक, कवी, लेखक आणि नवोदित साहित्यिकांच्या उपस्थितीत हे संमेलन पार पडणार आहे. हे साहित्य संमेलन धाराशिवकरांसाठी साहित्य, संस्कृती आणि विचारांची पर्वणी ठरणार असून उद्घाटन सोहळा, परिसंवाद, कवी संमेलन, कथाकथन, चर्चासत्रे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हे संमेलन यशस्वी करण्यासाठी स्वागताध्यक्ष म्हणून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.

यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे, राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे, मराठवाडा उपाध्यक्ष तुकाराम गंगावणे, जिल्हाध्यक्ष प्रा. राजा जगताप उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande