नांदेड - आयुर्वेदीय परिसंवाद 2026 उत्साहात संपन्न
नांदेड, 20 मे, (हिं.स.)। जिज्ञासा नांदेड महानगर व गुरुकृपा सुपर स्पेशालिटी आयुर्वेदिक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने, दिवंगत आदरणीय गुरुवर्य वैद्यराज दिलीप गाडगीळ सर यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त आयोजित आयुर्वेदीय परिसंवाद 2026 हा कार्यक्रम न
नांदेड - आयुर्वेदीय परिसंवाद 2026 उत्साहात संपन्न


नांदेड, 20 मे, (हिं.स.)। जिज्ञासा नांदेड महानगर व गुरुकृपा सुपर स्पेशालिटी आयुर्वेदिक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने, दिवंगत आदरणीय गुरुवर्य वैद्यराज दिलीप गाडगीळ सर यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त आयोजित आयुर्वेदीय परिसंवाद 2026 हा कार्यक्रम नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या महाविद्यालय, नांदेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या परिसंवादामध्ये आयुर्वेद क्षेत्रातील प्रख्यात तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. वै. अनंत धर्माधिकारी, वै. रेणुका गगळे, वै. निलेश लोढे, वै. संदीप जाधव तसेच वै. गजानन बडजे यांनी आयुर्वेदातील आधुनिक दृष्टीकोन, चिकित्सापद्धती व संशोधन विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.

या परिसंवादास युजी, पीजी विद्यार्थी तसेच आयुर्वेद क्षेत्रातील डॉक्टर मिळून सुमारे 130 सहभागी उपस्थित होते. कार्यक्रमास विविध वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर, विद्यार्थी तसेच आयुर्वेद अभ्यासकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. प्रमुख उपस्थिती म्हणून बालासाहेब पांडे, डॉ. अश्विनी जगताप, सदाशिव तुपेकर, अमोल गुंडे, वै. प्रसाद कुलकर्णी, डॉ. राहुल देशमुख, डॉ. राम मदने तसेच वै. शिवानंद बासटे उपस्थित होते.

परिसंवादातील व्याख्यानांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मान्यवर, वक्ते, उपस्थित सहभागी व कार्यकत्यांचे आयोजकांनी आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande