भाजप कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन जनजागृती करावी - लातूर जि. प.चे माजी अध्यक्ष
लातूर, 20 मे (हिं.स.)। भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांना सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेमध्ये प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवून आपली कागदपत्रे वेळेत पूर्ण करावीत. शासनाच्या सूचनांनुसार आवश्यक माहिती व कागदपत्रे सा
जनजागृती


लातूर, 20 मे (हिं.स.)। भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांना सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेमध्ये प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवून आपली कागदपत्रे वेळेत पूर्ण करावीत. शासनाच्या सूचनांनुसार आवश्यक माहिती व कागदपत्रे सादर करणे अत्यंत महत्त्वाचे असून कोणताही नागरिक या प्रक्रियेपासून वंचित रा हू नये, यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन जनजागृती करावी असे आवाहन माजी जि. प अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी केले.

जळकोट तालुक्यातील एसआयआर प्रमुखाची कार्यशाळा पार पडली. त्यावेळी ८८ बूथ प्रमुखापैकी ८४ बुथ प्रमुख उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे नेहमीच जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. त्यामुळे प्रत्येक बूथ, गाव व शहर स्तरावर नागरिकांना एआयआरसंदर्भातील माहिती समजावून सांगून त्यांना आवश्यक सहकार्य करावे. विशेषतः युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना या प्रक्रियेची योग्य माहिती देऊन त्यांचे अर्ज व कागदपत्रे पूर्ण करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. एकही पात्र नागरिक वंचित राहू नये' हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भाजप कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम करावे आणि शासनाच्या उपक्रमास यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन भाजपचे युवा नेते राहूल केंद्रे यांनी केले आहे.

या बैठकीस भाजपाचे नेते तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी. सत्यवान पांडे. सोमेश्वर सोपा. अरविंद नागरगोजे, शिवशंकर धुळशेट्टी. प्रशांत चव्हाण. बाबुराव गुट्टे. गौस कोतवाल, जयवंत सूर्यवंशी. संजय गोंटे, रत्नाकर केंद्रे. अविनाश नळंदवार. बालाजी तिडके, वैजनाथ केंद्रे, रावसाहेब पाटील, भाऊराव कांबळे, उलपे, बबन मरेवाड हे उपस्थित होते.

-------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande