बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष बैठक
छत्रपती संभाजीनगर, 20 मे (हिं.स.)। हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्याचे निरीक्षक श्री. सुनिल पाटील, खासदार श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार श्री. प्रवीण स्वामी, सहसंपर्कप्रमुख नंदू भैय्या र
अ


छत्रपती संभाजीनगर, 20 मे (हिं.स.)। हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्याचे निरीक्षक श्री. सुनिल पाटील, खासदार श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार श्री. प्रवीण स्वामी, सहसंपर्कप्रमुख नंदू भैय्या राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख श्री. रणजीत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली..

बैठकीत आगामी संघटनात्मक बांधणी, जनसंपर्क अधिक प्रभावी करण्यासह पक्षाच्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना जनसामान्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला..यावेळी प्रदीप बप्पा मेटे, शामलताई वडने, ऋषिकेश मगर, संजय मुंदडा, सचिन काळे, चेतन बोराडे, रवी वाघमारे, अमोल बिराजदार, मनोहर धोंगडे, विश्वजीत जाधव, सागर बाराते, इस्माईल कुरेशी आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande