करमाळ्यात अवैध वाळू उपसा सुरू; १६ ब्रास वाळूसह ट्रॅक्टर जप्त
सोलापूर, 20 मे (हिं.स.)। करमाळा तालुक्यातील सीना नदी परिसरात पाणी ओसरल्यानंतर वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत असून, महसूल विभागाने अशा कारवायां
करमाळ्यात अवैध वाळू उपसा सुरू; १६ ब्रास वाळूसह ट्रॅक्टर जप्त


सोलापूर, 20 मे (हिं.स.)।

करमाळा तालुक्यातील सीना नदी परिसरात पाणी ओसरल्यानंतर वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत असून, महसूल विभागाने अशा कारवायांविरोधात कठोर मोहीम सुरू केली आहे.बीटरगाव श्री परिसरात महसूल विभागाने पहाटेच्या सुमारास कारवाई करत १६ ब्रास वाळूसह एक ट्रॅक्टर जप्त केला. ही कारवाई तहसीलदारशिल्पा ठोकडेयांच्या पथकाने केली.मागील पुराच्या काळात मोठ्या प्रमाणात वाळू वाहून आल्याने सीना नदीपात्रात मोठा वाळूसाठा निर्माण झाला आहे. नदीतील पाणी ओसरताच वाळू उपशासाठी वाळूमाफिया सक्रिय झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. विशेषतः करमाळा आणि परांडा तालुक्यांच्या सीमेवरील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.तहसीलदारांच्या पथकातील तलाठी हर्षल शेंगळे, विवेक चिंतामणी, आदित्य मस्तुद तसेच पोलिस पाटील शोभा अभिमन्यू यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी रात्री गस्त घालत असताना दोन चाकी ट्रेलरसह वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर ताब्यात घेतला. ही वाळू चोरी बीटरगाव श्री येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील नदीपात्रातून सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.या प्रकरणात ट्रॅक्टर चालक दादासाहेब मुरूमकर यांचा समावेश असून, इतर संबंधितांचीही माहिती महसूल विभागाकडून घेतली जात आहे. अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी पुढील काळात आणखी कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande