
छत्रपती संभाजीनगर, 20 मे (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. ही कामे अधिक जलद आणि प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी आधुनिक यंत्रणेची चाचणी समर्थनगर येथे घेण्यात आली.
या आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून नाल्यांमधील गाळ आणि कचरा कमी वेळेत साफ करणे शक्य होणार असून, पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. लवकरच शहरातील विविध भागांमध्ये ही यंत्रणा कार्यरत करण्यात येणार आहे.
यावेळी महापौर श्री.समीर राजूरकर व मनपा आयुक्त श्री.अमोल येडगे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून यंत्रणेच्या कामकाजाची पाहणी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis