आचारसंहितेचा अमरावती मनपा आमसभेला फटका
अमरावती, 20 मे (हिं.स.) विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेची मासिक आमसभा स्थगित करावी लागणार आहे. या सभेत धोरणात्मक निर्णय घेता येणार नसल्याने ती स्थगित करण्यात येईल, असे सभागृह नेते चेतन गावंडे यांनी सांगितले. महापालिकेची म
आचारसंहितेचा मनपा आमसभेला फटका


अमरावती, 20 मे (हिं.स.)

विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेची मासिक आमसभा स्थगित करावी लागणार आहे. या सभेत धोरणात्मक निर्णय घेता येणार नसल्याने ती स्थगित करण्यात येईल, असे सभागृह नेते चेतन गावंडे यांनी सांगितले. महापालिकेची मासिक आमसभा दरमहा २० तारखेस आयोजित करण्यात येते. त्यानुसार ती आज, बुधवारी (ता. २०) आयोजित करण्यात आली. मात्र कालच विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आमसभेवर बंधणे आली आहेत. त्यामुळे आयोजित सभा होणार असली तरी ती इतिवृत्त मंजूर करून स्थगित करण्यात येणार आहे. या सभेत कोणत्याही धोरणात्मक विषयावर चर्चा करता येणार नसल्याने निर्णय घेता येणार नाहीत. त्यामुळे आमसभा स्थगित करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande