
नांदेड, 20 मे (हिं.स.)।
नीट पेपरफुटी मुळे विद्यार्थी वर्गात असुरक्षिततेचे वातावरण आहे. पेट्रोल डिजेल दरवाढीमुळे महागाई वाढत आहे दुसरीकडे खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे जेवण महाग होत आहे, त्यात कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. सर्वत्र असंतोषाचे व असुरक्षिततेचे वातावरण असुन तात्काळ यावर तोडगा काढावा अशी मागणी काँग्रेस उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांच्या नेतृत्वात नांदेड काँग्रेसने केली आहे. दरम्यान त्यांच्या नेतृत्वात सदर मागण्यांचे निवेदन काँग्रेसच्या वतीने देण्यात आले. नीट परीक्षेतील सर्व गैरप्रकाराची निष्पक्ष चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. दोषी कोचिंग क्लासेस चालकांकडून संबंधित विद्यार्थ्यांचे संपूर्ण कोचिंग शुल्क वसूल करून विद्यार्थ्यांना परत द्यावेत. पेट्रोल डिजेल व खाद्यतेलाचे वाढलेले दरवाढ कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव व योग्य बाजारभाव मिळवून द्यावा. कांदा खरेदी केंद्र सुरु करुन अनुदान जाहीर करावे, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, सुरेशदादा गायकवाड, डॉ. श्रावण रँपनवाड, सुरेंद्र घोडजकर, अनिल मोरे आदीसह इतर पदाधिकारी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis