नांदेडमध्ये अवैध वाळू उपसा, गुटखा विक्रीवर कारवाई, 2.86 कोटींचा मुद्देमाल हस्तगत
नांदेड, 20 मे (हिं.स.)। नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस उप महानिरीक्षक यांच्या अधिपत्याखालील पथकाने जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाणे हद्दीत मौजे बोरगाव येथील गोदावरी नदीचे घाटावर अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्य
नांदेडमध्ये अवैध वाळू उपसा, गुटखा विक्रीवर कारवाई, 2.86 कोटींचा मुद्देमाल हस्तगत


नांदेड, 20 मे (हिं.स.)।

नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस उप महानिरीक्षक यांच्या अधिपत्याखालील पथकाने जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाणे हद्दीत मौजे बोरगाव येथील गोदावरी नदीचे घाटावर अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या 9 जणांविरुद्ध कार्यवाही करून त्यांच्याकडून दोन हायवा. एक टिप्पर, जेसीबी मशीन, इंजिन बोट, फायबर बोट, दहा तराफे व 50 ब्रास वाळू असा 1 कोटी 36 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अवैध गुटखा विक्री करणाऱ्या 2 इसमविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून 30 लाख 69 हजार 748 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मटका जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या एकूण 11 इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत 3 गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून 91 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासोबतच, अवैध दारू विक्री करणाऱ्या 34 इसमांविरुद्ध 29 गुन्हे दाखल करून, त्यांच्याकडून 1 लाख 88 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध वाळू उपसा करणाऱ्यां विरुद्धही (2) गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून 1 कोटी 16 लाख 55 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उपरोक्त कारवाई सोबतच, शस्त्र अधिनियमान्वये 2, कोटपा अन्वये 5 तर इतर अधिनियमाखाली मिळून, एकूण 45 कारवाया करण्यात आल्या असून, यात निष्पन्न झालेल्या आरोपीकडून एकूण 2 कोटी 86 लाख 19 हजार 883 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande