
नांदेड, 20 मे (हिं.स.)। पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी नगरसेवक जंगले यांची निवड करण्यात आली.
लोहा येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 301 व्या जयंती निमित्त लोहा शहरातील बिरोबा मंदिर येथे सकल समाजाची बैठक संपन्न झाली. त्यामध्ये सर्वानुमने बैठकीमध्ये अध्यक्षपदी श्री मारोतराव जंगले नगरसेवक, लोहा यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून, पाराजी धुळगुंडे, केशव खांडेकर सचीव, बालाजी शेवरे यांची निवड करण्यात आली.
या निवडीला माधव डोईफोडे, व्यंकटेश नाईक, संदिप बाजगीर, वैभव हाके, नवनाथ पोले, संतोष जंगले, किसन गुंठे, माधव देवकते, गजानन कराडे, बालाजी शेवरे, माळेगावचे सरपंच हनमंत धुळगुंडे, पोलिसवाडीचे माजी सरपंच पिराजी धुळगुंडे, तेजेराव बाजगीर, मंगरुळचे सरपंच किरण पाटील हाके, धिरज भैय्या हाके, माधव शिंदे, केशव खांडेकर, वैभव जकवाड, बालाजी खांडेकर, व्यंकट जंगले, परमेश्वर पोले, पाडुरंग धुळगुंडे, सोमनाथ जंगले, बालाजी सुरनर या आदीसह उपस्थित होते. 7 जून 2026 रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात लोहा शहरात साजरी करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis