वरझडी, ता.छत्रपती संभाजीनगर येथे एकूण १ कोटी ५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण
छत्रपती संभाजीनगर, 20 मे (हिं.स.)। वरझडी, ता.छत्रपती संभाजीनगर येथे एकूण १ कोटी ५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न झाले. जिल्हा वार्षिक योजनेतून ७५ लाख रुपयांच्या निधीतून वरझडी ते बनगाव रस्त्याचे लोकार्पण, आमदार निधीत
Q


छत्रपती संभाजीनगर, 20 मे (हिं.स.)।

वरझडी, ता.छत्रपती संभाजीनगर येथे एकूण १ कोटी ५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न झाले.

जिल्हा वार्षिक योजनेतून ७५ लाख रुपयांच्या निधीतून वरझडी ते बनगाव रस्त्याचे लोकार्पण, आमदार निधीतून २० लाख रुपयांच्या सभागृहाचे भूमिपूजन तसेच माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या खासदार निधीतून १० लाख रुपयांच्या सभागृहाचे लोकार्पण ही विकास कामे पूर्ण करण्यात आली.

वरझडी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. तसेच समृद्धी पूल नाथनगर ते वरझडी फाट्यापर्यंतच्या रस्त्याचे काम लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन गावकऱ्यांना दिले.

यावेळी छत्रपती राजे संभाजी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री.दामू आण्णा नवपुते, मुख्य अभियंता श्री.अतुल चव्हाण, पं.स.सभापती श्री.कल्याण नाना गायकवाड, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष श्री.आप्पासाहेब शेळके, जिल्हा परिषद सदस्या साधनाताई कुलकर्णी, भाजपा मंडळ अध्यक्ष श्री.सुदाम ठोंबरे, खरेदी विक्री संघाच्या संचालिका नंदाताई सुरेश पठाडे, सन्माननीय संचालक, पदाधिकारी, गावातील ज्येष्ठ मंडळी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande