
छत्रपती संभाजीनगर, 20 मे (हिं.स.)।
खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर विभागीय खरीप पूर्वतयारी बैठक आणि खरीप नियोजनाचा आढावा विभागीय आयुक्त कार्यालयात झाला. या बैठकीत विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी विभागातील छत्रपती संभाजीनगर,जालना ,बीड, लातूर, परभणी हिंगोली, नांदेड व धाराशिव या जिल्ह्यांचा सविस्तर आढावा सादर केला.
आणि खत व इतर कृषी निविष्ठांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जी .श्रीकांत यांनी दिले.
यावर्षी संभाजीनगर महसूल विभागामध्ये खरीप हंगाम २०२६ साठी एकूण ४९.४४ लाख हेक्टरक्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. या हंगामासाठी विभागाकडे १७.११ लाख मे.टन खतांची मागणी नोंदवण्यात आली असून, त्यापैकी १४.७३ लाख मे. टन आवंटन मंजूर झाले आहे. तसेच मागील रब्बी हंगामातील शिल्लक साठा ७.१९ लाख मे. टन एवढा आहे. म्हणजेच खरीप हंगामासाठी एकूण २१.९२ लाख मे. टनएवढा खत साठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे बियाणे व खतांची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही कृषी विभागाने दिली आहे .
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis