वाघोळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन नवीन वर्गखोल्यांचे भूमिपूजन
छत्रपती संभाजीनगर, 20 मे (हिं.स.)। आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते वाघोळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन नवीन वर्गखोल्यांचे भूमिपूजन व सिमेंट बंधारा क्रमांक १३ चा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरांप
अ


छत्रपती संभाजीनगर, 20 मे (हिं.स.)।

आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते

वाघोळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन नवीन वर्गखोल्यांचे भूमिपूजन व सिमेंट बंधारा क्रमांक १३ चा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरांप्रमाणे गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षण मिळावे, या उद्देशाने शाळेमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत..

वाघोळा जिल्हा परिषद शाळेने तालुक्यात आदर्श व गुणवत्ताधिष्ठित शाळा म्हणून ओळख निर्माण करावी, यासाठी भौतिक सुविधा, शैक्षणिक साधने आणि विकासकामांना प्राधान्य आणि 'वाघोळा आयडॉल व्हिलेज' संकल्पना साकार करण्यासाठी गावातील शिक्षण, पायाभूत सुविधा, सामाजिक विकासाशी संबंधित विविध विषयांवरही चर्चा केली.. या विकासकामांमुळे गावातील शैक्षणिक आणि पायाभूत विकासाला नवी दिशा मिळेल..

यावेळी फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक श्री.विकास पाटील गायकवाड, मुख्याध्यापक श्री.बावस्कर, शालेय समिती अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर गायकवाड, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande