
बीड, 20 मे (हिं.स.)।
माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या उपस्थितीत पीक विमा आणि पोखरा योजना त्रुटी बाबत कृषी मंत्री यांच्या दालनात बैठक संपन्न झाली.
मागील काही दिवसांपूर्वी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० (पोखरा) योजनेतील त्रुटी दूर करून निकषांमध्ये सुधारणा करण्यात यावी, यासाठी कृषी मंत्री यांच्याकडे विनंती केली होती. त्या अनुषंगाने आज मंत्रालयात बैठक संपन्न झाली.
तसेच, खरीप हंगाम 2025 करिता हेक्टरी ₹17,500 पीक विमा नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी आग्रही मागणी कृषी मंत्री श्री. दत्ता मामा भरणे यांच्याकडे करण्यात आली. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना हा विमा मिळणे अत्यावश्यक असून त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.विमा प्रश्न निश्चितच सकारात्मक निर्णय होईल हा विश्वास आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने पाठपुरावा करून त्यांच्या न्याय्य मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम पुढेही सुरू राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis