पुणे-मतदार नोंदणी, दुरुस्ती आणि नाव वगळण्याबाबत नागरिकांना जागरूक करण्याचे आवाहन
पुणे, 20 मे (हिं.स.)भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक पार पडली.उपजिल्हा निवडणूक अधिकारी
पुणे-मतदार नोंदणी, दुरुस्ती आणि नाव वगळण्याबाबत नागरिकांना जागरूक करण्याचे आवाहन


पुणे, 20 मे (हिं.स.)भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक पार पडली.उपजिल्हा निवडणूक अधिकारीमिनल कळसकरयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित बैठकीत विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती, निवडणूक आयोगाने जाहीर केलेले वेळापत्रक आणि जिल्ह्यातील तयारीचा आढावा घेण्यात आला.

बैठकीत मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी मतदान केंद्रस्तरावर प्रभावी समन्वय ठेवणे, पात्र मतदारांची नोंदणी वाढविणे तसेच नाव वगळणे आणि दुरुस्ती प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. या मोहिमेची व्यापक प्रसिद्धी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, अशा सूचनाही देण्यात आल्या.मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रियेत राजकीय पक्षांनी सहकार्य करून अधिकाधिक पात्र नागरिकांची नोंदणी सुनिश्चित करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारीज्योती कदम, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच निवडणूक विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी मिनल कळसकर यांनी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande