भोगवटा पत्र नसलेल्या इमारतीत ‘मोटेगावकर क्लास’; पुणे महापालिकेची सीलिंग कारवाई
पुणे, 20 मे (हिं.स.)। डेक्कन जिमखाना परिसरातील भोगवटा पत्र नसलेल्या अनधिकृत इमारतीमध्ये गेल्या चार वर्षांपासून आर आर सी मोठेगावकर क्लासेस सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुणे महापालिका प्रशासनाने संबंधित इमारतीवर तब्बल ३
hgf


पुणे, 20 मे (हिं.स.)।

डेक्कन जिमखाना परिसरातील भोगवटा पत्र नसलेल्या अनधिकृत इमारतीमध्ये गेल्या चार वर्षांपासून आर आर सी मोठेगावकर क्लासेस सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुणे महापालिका प्रशासनाने संबंधित इमारतीवर तब्बल ३ कोटी २० लाख रुपयांचा मिळकत कर आकारला असून इमारत सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याप्रकरणी मनसेकडून मंगळवारी महापालिका भवनात जोरदार आंदोलन करण्यात आले. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी बांधकाम विभागाला कारवाईचे आदेश दिले होते.मात्र, इतका काळ उलटल्यानंतरही बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. भोगवटा पत्र नसल्यामुळे मिळकत कर विभागाने संबंधित मालमत्तेवर तिप्पट दंडासह ३.२० कोटी रुपयांची कर आकारणी केली.

दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणात आरसीसी मोटेगावकर क्लासेसच्या प्रमुखाचे नाव चर्चेत आल्याने हे प्रकरण आणखी गाजत आहे. या पार्श्वभूमीवर संभूस यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी महापालिकेत आंदोलन करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.यावेळी आयुक्तांनी संबंधित इमारत तातडीने सील करण्याचे आदेश दिल्याची माहिती हेमंत संभूस यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande