नंदुरबारमध्ये मानवाधिकार आयोगाची आढावा बैठक; सर्वसमावेशक विकासावर भर
नंदुरबार, 20 मे: राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, नवी दिल्लीचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज मानवाधिकार आयोग व सर्वसमावेशक विकासाशी संबंधित विषयांवर जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली.या बैठ
नंदुरबारमध्ये मानवाधिकार आयोगाची आढावा बैठक; सर्वसमावेशक विकासावर भर


नंदुरबार, 20 मे: राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, नवी दिल्लीचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज मानवाधिकार आयोग व सर्वसमावेशक विकासाशी संबंधित विषयांवर जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली.या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप तसेच विविध विभागांचे अंमलबजावणी अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी नंदुरबार जिल्ह्याची भौगोलिक, आर्थिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक स्थिती तसेच रस्ते विकास, सुरू असलेली प्रमुख कामे आणि अडचणींबाबत सविस्तर माहिती सादर केली.राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांनी बालकांचे हक्क, बाल न्याय व्यवस्था, शिक्षण विभाग, आदिवासी विकास, दिव्यांग व्यक्तींचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज, आरोग्य, रोजगार व कौशल्य विकास यासह विविध महत्त्वाच्या विषयांचा आढावा घेतला.

तसेच मानवी तस्करी, क्रीडा व मानवाधिकार, युवा व्यवहार, सांस्कृतिक व कलात्मक अभिव्यक्ती तसेच बाल लैंगिक शोषण यांसारख्या संवेदनशील विषयांवरही त्यांनी चर्चा केली.केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना तसेच लागू असलेल्या नवीन कायदे व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. मानवाधिकाराशी संबंधित सर्व विषयांवर प्रभावी अंमलबजावणी करण्यावरही त्यांनी भर दिला.

---------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande